cheque-bounce-case-court-akl: धनादेश अनादर प्रकरणात आरोपी दोषी; न्यायालयाकडून कारावास व दुप्पट रकमेची शिक्षा, ॲड. विशाल लढ्ढा यांचा प्रभावी युक्तिवाद
ठळक मुद्दा
*अकोला न्यायालयाचा महत्वाचा निर्णय; आर्थिक गैरप्रकारांविरोधात कडक संदेश.
*ॲड. विशाल लढ्ढा यांचा प्रभावी युक्तिवाद.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : धनादेश अनादर प्रकरणात (कलम १३८, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट) आरोपीस अकोला न्यायालयाने दोषी ठरवत कारावास व नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात फिर्यादीची बाजू ॲड. विशाल लढ्ढा यांनी प्रभावी मांडली.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय क्र. ६, अकोला यांनी एस.एस.सी. क्र. ५१५२/२०२२ या प्रकरणात हा महत्वाचा निकाल १३ मे रोजी दिला आहे. न्यायालयाने आरोपी शैलेश शांतीलाल वाघमारे यास दोषी ठरवत धनादेशाच्या दुप्पट रकमेची भरपाई तसेच दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
फिर्यादी दीपक सुखिराम गुरखुद्दे यांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने सुनावणीदरम्यान सादर पुरावे, युक्तिवाद आणि व्यवहाराची कायदेशीर बाजू विचारात घेत, आरोपीने दिलेला धनादेश हा कायदेशीर परतफेडीसाठी दिलेला असल्याचे मान्य केले.
सदर प्रकरणात तक्रारकर्त्यांच्या वतीने ॲड. विशाल कि. लढ्ढा यांनी काम पाहिले. न्यायालयाचा हा निर्णय आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता व विश्वास टिकवण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे.
आरोपीने सदर धनादेश हा कायदेशीर परतफेडीकरीता दिलेला असल्याचे न्यायालयाने मान्य केले. प्रकरणातील पुरावे, युक्तीवाद विचारात घेवुन न्यायालयाने असे निष्पन्न केले की,
१) आरोपी यांना दोषी ठरवुन २ महीन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
२) आरोपीने फिर्यादीस रक्कम ८०,०००/-रू. इतकी नुकसान भरपाई तकारकर्त्यास देण्याचा आदेश (कलम ३५७ (३) फौजदारी प्रक्रिया संहीता)
३) नुकसान भरपाई न दिल्यास १ महीन्याची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी.
ठळक मुद्दे
*आरोपीस २ महिन्यांचा साधा कारावास
*फिर्यादीस ८० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश
*नुकसान भरपाई न दिल्यास अतिरिक्त १ महिन्याचा कारावास
*धनादेश गैरव्यवहारांविरोधात न्यायालयाचा कठोर संदेश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा