admission-open-hostel-akola: मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (आदर्श कॉलनी), अकोला येथील इयत्ता ८ वी ते वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वसतिगृहातील रिक्त जागांनुसार प्रवेश अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 


अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, तसेच अनाथ, अपंग व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी ही सुविधा उपलब्ध असून, वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 



ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून अर्जदारांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. पात्र व गरजू विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल विद्या बी. कुळकर्णी यांनी केले आहे. 

टिप्पण्या