प्रातिनिधिक चित्र
ठळक मुद्दा
येलो अलर्ट; ३०–४० किमी वेगाने वारे, मेघगर्जना आणि हलक्या पावसाची शक्यता
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरासह जिल्ह्यात रविवारी हवामानाने अचानक पलटी घेतली. दिवसभर प्रचंड उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर रात्री अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषतः रात्री ९ वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हवामान खात्याचा इशारा (Nowcast Warning)
IMD, RMC Nagpur यांनी रात्री ८:३० वाजता तात्काळ हवामान इशारा (Nowcast) जारी केला होता.
इशाऱ्याची वैधता: २ तास
अलर्ट प्रकार: येलो अलर्ट
हवामान स्थिती:
प्रभावित जिल्हे
Buldhana,Akola,Amravati and Yavatmal
आंबा उत्पादकांना मोठा फटका
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील कच्चे आणि पिकलेले आंबे मोठ्या प्रमाणावर खाली पडले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, आधीच उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या बागायतींना हा आणखी एक मोठा धक्का ठरला आहे.
नागरिकांसाठी खबरदारी
वादळी वाऱ्याच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा
विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली उभे राहू नका
हलक्या वस्तू (टीन, बॅनर) सुरक्षित ठेवा
मोबाईल/इलेक्ट्रिक उपकरणे सुरक्षित वापरा
ठळक मुद्दे
चिंतेचा विषय
अकोल्यात हवामानातील हा अचानक बदल शेतकरी आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पुढील काही दिवसांतही अशाच स्वरूपाचे वातावरण राहण्याची शक्यता असल्याने सतर्क राहणे गरजेचे आहे.
हवामान अंदाज
IMD,RMC Nagpur
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा