ravindra-meshram-passes-away: ग्राफिक डिझायनर रवींद्र मेश्राम यांचे निधन; हास्य जत्रा फेम कुणाल मेश्राम यांना पितृशोक



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील सुप्रसिद्ध ग्राफिक डिझायनर, टायपोग्राफर श्री रवींद्र मेश्राम (70) यांचे काल दि. सोमवार 20 एप्रिल 2026 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. 



अत्यंत संघर्षातून त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबई मधून बॅचलर ऑफ फाईन आर्ट (अप्लाइड आर्ट ) ही पदवी प्राप्त केली होती. 80 च्या दशकात काही चित्रपटांची शीर्षकेही त्यांनी तयार केली होती. अकोला शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांचे त्यांनी लोगो डिझाईन तयार केले होते. टायपोग्राफी, आणि ऑइल पेंटिंग पोर्ट्रेट यामध्ये त्यांचा हातखंडा होता. साइन बोर्ड च्या काळात त्यांनी आपल्या कुंचल्याने अनेक बोर्डांना सुंदर, आकर्षक अक्षरांनी सजवले होते. 



महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील सुप्रसिद्ध कलावंत कुणाल मेश्राम यांचे ते वडील होत. रवींद्र मेश्राम यांच्या मागे त्यांच्या पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने अकोला कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.  त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी चार वाजता त्यांचे निवासस्थान बुद्ध विहाराच्या मागे, आंबेडकर चौक, अकोट फाईल येथून नायगाव स्मशानभूमी करता निघेल.

टिप्पण्या