municipal-corporation-census: महानगरपालिका जनगणना प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण कार्यारंभ



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शासनाच्या आदेशान्वये भारताची जनगणना कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असून या अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रातील जनगणना कामाकरिता नियुक्त करण्यात आलेले व या जनगणना कामाचा प्रमुख कणा असलेले जनगणना प्रगणक व पर्यवेक्षक यांना जनगणन-2027 अंतर्गत करावयाची संपुर्ण प्रक्रिया बाबतचे संपुर्ण ज्ञान असावे, तसेच डिजीटल स्वरूपाची करण्यात येणारी जनगणना मोबाईलव्दारे हाताळण्याकरिता आवश्यक प्रशिक्षण अकोला महानगरपालिका जनगणना विभागामार्फत देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाचा प्रारंभ राज्य शासनाच्या सुचनेनुसार 23 एप्रिल 2026 रोजी करण्यात आला असून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, अकोला महानगरपालिका डॉ.सुनिल लहाने यांच्या हस्ते करण्यात आले.





अकोला महानगरपालिका चारही क्षेत्रांतर्गत नियुक्त चार जनगणना अधिकारी यांचे नियंत्रणाखाली एकुण 8 ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. सदरचे प्रशिक्षण तीन दिवसीय सत्रामध्ये सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत यावेळेत नियुक्त फील्ड ट्रेनर यांचेमार्फत देण्यात येणार आहे. 


सदरचे प्रशिक्षण शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे दोन प्रशिक्षण वर्ग, आर.एल.टी. महाविद्यालय येथे दोन प्रशिक्षण वर्ग, स्कुल ऑफ स्कॉलर्स, हिंगणा रोड येथे दोन प्रशिक्षण वर्ग, तर श्री शिवाजी विद्यालय, मुख्य शाखा, देशमुख पेठ येथे दोन प्रशिक्षण वर्ग अशा एकुण आठ ठिकाणी संबंधीत चार जनगणना अधिकारी असून पुर्व झोनचे जनगणना अधिकारी राजेश सरप, पश्चिम झोनचे जनगणना अधिकारी गजानन घोंगे, उत्तर झोनचे जनगणना अधिकारी विठ्ठल देवकते आणि दक्षिण झोनचे जनगणना अधिकारी देविदास निकाळजे यांचे नियंत्रणांतर्गत सुरू करण्यात आले आहे. 




या प्रशिक्षण उद्घाटनपर मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी, उपस्थित प्रगणक व पर्यवेक्षक यांना जनगणना-2027 अंतर्गत प्रमुख दोन टप्प्यामध्ये काम करावयाचे असून पहिल्या टप्प्यामध्ये घरयादी आणि घर गणना बाबत तर दुस-या टप्प्यामध्ये लोकसंख्या गणना करावयाचे महत्वाचे काम प्रथमच डिजीटल स्वरूपात मोबाईलव्दारा माहिती घेऊन संकलीत करून जनगणना कार्यालयास उपलब्ध करून द्यावयाची असल्याने सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांनी याचा महत्व समजून जबाबदारीने मनापासून समर्पित होऊन राष्ट्रभावना ठेवून अचूक व सत्यतेवर आधारित माहिती संकलीत करावी याबाबत उपस्थितांना आवाहन केले, तसेच या जनगणनेच्या कामावर भारत देशाचा पुढील विकसात्मक कामाचा भर राहणार असल्याने सदरचे काम प्राधान्याने व बिनचूक करावे असे सुध्दा यावेळी सांगितले. 




या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीष साबू होते. तर पश्चिम क्षेत्राचे जनगणना अधिकारी गजानन घोंगे, जनगणना विभाग प्रमुख अनिल बिडवे यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अनिल बिडवे यांनी केले आणि प्रास्ताविक प्रशिक्षक राजीव भिरड तसेच आभार प्रदर्शन क्षेत्रीय प्रशिक्षक मकफूर अहमद यांनी केले. 




आजचे बाजार भाव


सौजन्य: अकोला कृषि उत्पन्न बाजार समिती 


टिप्पण्या