lpg-supply-png-network-mah-: राज्यात इंधन मुबलक; एलपीजी पीएनजी पुरवठा सुरळीत!सरकारची व्यापक तयारी; काळाबाजारावर कडक कारवाई, नागरिकांना दिलासा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीति वत्स
मुंबई, दि. ६ : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दिली. पीएनजी नेटवर्कचा वेगाने विस्तार करत नागरिकांना स्वस्त आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पीएनजीचा झपाट्याने विस्तार
राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या २५.३६ लाखांवर
गेल्या एका महिन्यात ७३ हजार नवीन कनेक्शन
सीजीडी पाईपलाईनसाठी Deemed Permission निर्णयामुळे विस्ताराला गती
३० जूनपर्यंत पीएनजी बंधनकारक (जिथे नेटवर्क उपलब्ध)
पीएनजी स्वस्त आणि देशांतर्गत उत्पादन जास्त असल्याने वापर वाढवण्याचे आवाहन
इंधन पुरवठा स्थिर; टंचाई नाही
राज्यात २४ तेल डेपोमार्फत ८,१०० पेट्रोल पंपांना सेवा
दररोज सुमारे:
१८,५०० केएल पेट्रोल
४०,००० केएल डिझेल वितरण
एप्रिलच्या सुरुवातीची विक्री सरासरीप्रमाणेच; टंचाईचा प्रश्न नाही
एलपीजी पुरवठा नियंत्रणात
२३ बॉटलिंग प्लांट्स, २,२०० वितरक
सुमारे ३.५ कोटी ग्राहकांना सेवा
दररोज ५.८२ लाख सिलिंडर रिफिल
९५% बुकिंग ऑनलाइन, डिजिटल बुकिंगला प्रोत्साहन
पारदर्शकतेसाठी DAC (Delivery Authentication Code) सक्तीचा
व्यावसायिक एलपीजी वाटपाचे प्राधान्य
अत्यावश्यक सेवांना १००% पुरवठा
संरक्षण, रेल्वे, पोलीस विभागांना ७०%
उद्योग व इतर क्षेत्रांना २०–५०%
हॉटेल, उपहारगृहे, कॅन्टीन यांना अतिरिक्त २०% वाटप
काळाबाजारावर मोठी कारवाई
१४,३२९ तपासण्या, ३,६२८ सिलिंडर जप्त
५३ गुन्हे दाखल, ३६ आरोपी अटक
२१ वाहने व २ टँकर्स जप्त
जप्त मालमत्ता अंदाजे ₹२.३८ कोटी
तक्रार निवारण यंत्रणा सक्रिय
राज्यभर नियंत्रण कक्ष सुरू
एलपीजी तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप: ९७६९९१९२२१
१७ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान २,४०९ तक्रारी प्राप्त
नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन
जिथे पीएनजी उपलब्ध आहे तिथे नोंदणी करा
एलपीजी बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करा
अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा