hivarkhed-murder-case-akl-: वडिलांच्या खुनानंतर मुलगा फरार… हिवरखेड पोलिसांची विजेच्या वेगाने कारवाई; अवघ्या २ तासांत आरोपी जेरबंद!
ठळक मुद्दा
लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून वडिलांचा खून; दहिगाव–पंचगव्हाण मार्गावरून पळताना आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात वडिलांच्या खुनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलानेच आपल्या वडिलांचा निर्घृण खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, हिवरखेड पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या २ तासांत आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले आहे.
आज (२० एप्रिल २०२६) सकाळी सुमारे ७ वाजता हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांना फोनद्वारे माहिती मिळाली की, दिपक रामदास चतुरकार याने आपले वडील रामदास सहदेवराव चतुरकार यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून त्यांचा खून केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राठोड यांनी तात्काळ पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले तसेच पोलीस कर्मचारी प्रफुल पवार आणि प्रमोद चव्हाण यांच्या पथकाने गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला.
शोधमोहीमेदरम्यान आरोपी दहिगाव फाटा ते पंचगव्हाण फाटा या मार्गावरून पळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ततकाळ शिताफीने सापळा रचून आरोपीला घटनेनंतर अवघ्या २ तासांत ताब्यात घेतले आणि हिवरखेड पोलीस ठाण्यात आणले.
घरगुती किरकोळ वादातून हत्येसारखी ही गंभीर घटना घडली असल्याचे तपासात प्रथम दर्शनी दिसते आहे. मात्र, या घटने मागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आरोपीची कसून चौकशी झाल्यानंतर हत्येमागील उद्देश समोर येईल.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास ठाणेदार गजानन राठोड हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
ठळक मुद्दे
मुलाकडून वडिलांचा लोखंडी रॉडने खून
घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघड
आरोपी घटनास्थळावरून फरार
पोलिसांचे तात्काळ पथक तयार
गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम
दहिगाव–पंचगव्हाण मार्गावरून आरोपी पकडला
अवघ्या २ तासांत अटक – पोलिसांची मोठी कामगिरी
तपास सुरू
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा