- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: उद्धवसेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या घरासमोर उभी असलेले त्यांचे वाहन क्रमांक MH 30 BB 2700 ची अज्ञात चार ते पाच इसमांनी तोडफोड केल्याची घटना 1 मार्च रविवार रोजी रात्री 9.40 च्या सुमारास घडली आहे.
या घटनेमुळे उमरी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. काही अज्ञात इसम हातामध्ये पाईप व दगड घेऊन फिरत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
या घटनेची माहिती सिविल लाईन्स पोलीस स्टेशनला दिल्यानंतरही घटनास्थळावर कोणीही पोलीस कर्मचारी फिरकला नसल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला.
घटनेची माहिती मिळताच उद्धव सेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख मंगेश काळे, शहर प्रमुख आशिष गावंडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक घटनास्थळावर दाखल झाले होते.
दरम्यान, या घटनेमधील 4 संशयित आरोपीना पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
दरम्यान, हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.
Akola crime
Akola police
breaking news
city chief
political news
Rahul Karale
Shiv Sena
uddhav thakarey
vandalized
vehicle
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा