breaking-news-akola-crime-akl: बेपत्ता सर्वज्ञचा शोध अखेर संपला; मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू
ठळक मुद्दा
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना दुर्गंधी आल्याने घटना उघड
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली. 19 मार्चपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय सर्वज्ञ निंबाळकर या बालकाचा मृतदेह आज सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील एका नाल्यात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आझाद चौक, शिवर, अकोला येथून 19 मार्च सकाळी 11 वाजल्यापासून सर्वज्ञ निलेश निंबाळकर हा अकरा वर्षीय बालक खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडत नसल्याने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, आज 22 मार्च रोजी सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही नागरिकांना नाल्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका लहान मुलाचा मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात मृत्यू अपघाती आहे की इतर काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ठळक मुद्दे
अकोल्यातील 11 वर्षीय सर्वज्ञ निंबाळकर 19 मार्चपासून बेपत्ता होता
कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार
आज सकाळी कृषी विद्यापीठ परिसरातील नाल्यात मृतदेह आढळला
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना दुर्गंधी आल्याने घटना उघड
पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला; तपास सुरू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा