भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: नागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ग्राम कुरुम शिवारातील तीन पुलाजवळ आज ०७ फेब्रुवारी रोजी रात्रीचे सुमारास आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.
एमएच-२९-बीएफ-६०७४ क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून संभाजीनगर कडे लोखंडी पाइप घेऊन जात होता. दरम्यान अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने पुला जवळील खोल दरीत जाऊन पडला.
अपघाताच्या धक्क्याने ट्रकमधील लोखंडी पाइप हे ट्रकच्या केबिनमध्ये जाऊन पडले. आणि ते थेट चालक अनिसउद्दीन रफिकउद्दीन काझी आणि क्लीनर मोहम्मद रेहान मोहम्मद नाजिम (दोन्ही रा. जोहर नगर बुलढाणा) यांच्या अंगावर कोसळले. या गंभीर अपघातात दोघेही अत्यवस्थ जखमी होऊन जागीच ठार झाल्याचे कळते.
घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेचा पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. दीपक सोळंके करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा