- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
sadanand-date-police-maha: सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक; दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (DGP) वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारने जारी केला. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३ जानेवारी रोजी निवृत्त होत असून, त्यानंतर दाते पदभार स्वीकारतील. गृहविभागाने स्पष्ट केले आहे की, सदानंद दाते यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
सदानंद दाते हे १९९० तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, ते सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. केंद्रीय समितीने दोन आठवड्यांपूर्वी त्यांना मुदतपूर्व कर्तव्यमुक्त केल्याने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदावरील त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतिरेक्यांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे अधिकारी म्हणून सदानंद दाते ओळखले जातात. कडक शिस्त, धाडसी निर्णय आणि कर्तव्यनिष्ठा ही त्यांची ओळख आहे.
आतापर्यंतचा उल्लेखनीय कार्यकाळ
दाते यांनी यापूर्वी मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख म्हणून काम केले आहे.
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेले दहशतवाद विरोधी कक्ष आणि सोशल मीडिया सेल ही संकल्पना त्यांच्या पुढाकारातूनच प्रत्यक्षात आली. तसेच न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालवणे ही महत्त्वपूर्ण सुधारणा देखील दाते यांच्या कार्यकाळात अंमलात आणली गेली.
अनुभव, धाडस आणि आधुनिक पोलिसींगचा दृष्टिकोन असलेले अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस महासंचालक
महाराष्ट्र राज्य
सदानंद दाते
Director General
maharashtra state
Police
Sadanand Date
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा