- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
sports-festival-mahapareshan: महापारेषण वीज कर्मचारी क्रीडा महोत्सव आरंभ; सांघिक खेळाचे सामने दिवसभर रंगले
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अकोल्याच्या वसंत देसाई क्रीडा संकुल येथे आयोजित आंतरमंडळीय क्रीडा महोत्सवाचे बुधवारी थाटात उदघाट्न पार पडले.
या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट, पारस महानिर्मितीचे मुख्य अभियंता शरद भगत, तसेच अमरावती महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्यात किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूल च्या स्काऊट गाईड च्या पथकाने दिलेली मानवंदना आकर्षण ठरली. क्रीडा साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उदघाट्न सत्राचे प्रास्ताविक क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष तथा अधीक्षक अभियंता संजय काटकर यांनी केले. तदनंतर मान्यवरानी मनोगत व्यक्त केले. उदघाटक राजेश नाईक यांनी दिमाखदार सोहळ्याचे कौतुक करीत खेळाडूंना शुभेच्छा देत उदघाट्न झाल्याचे जाहीर केले. त्यांनतर एल आर टी महाविद्यालयचे एन सी सी व पातूरच्या किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूलच्या स्काऊट गाईड पथकाचे पथसंचलन करीत महापारेषणच्या सहभागी स्पर्धकांचा रूट मार्च पार पडला. त्यानंतर मशाल प्रज्वलित करीत मान्यवरांना सन्मानाने संपूर्द करण्यात आली. उदघाटक संजीव भोळे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर चार संघाचे रंगसंगती असलेले बलून आकाशात मान्यवरांच्या हस्ते सोडून खेळाडूंनी उंच भरारी घेण्याचा संदेश देण्यात आला.
या उदघाट्न सत्राचे संचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता समीर देशपांडे यांनी केले. तर क्रीडा महोत्सवाचे सचिव तथा कार्यकारी अभियंता विनोद हंबर्डे यांनी आभार मानले.
या महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, ब्रिज या खेळाचे सामने दिवसभर रंगले. दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता धावणे, रिले, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे विविध मैदानी खेळ रंगणार आहेत व त्यानंतर अंतिम सामने होणार असून त्याचे पारितोषिक वितरण सायंकाळी ४ वाजता वसंत देसाई स्टेडियम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी महापारेषण अऊदा संवसु अकोला मंडळाचे अधिकारी व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.
क्रीडा महोत्सव
महाराष्ट्र राज्य
विद्युत पारेषण
Amravati circle
electricity
Mahapareshan
Sports festival
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा