- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-news-viral-video: अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग: मारहाण चित्रीकरण सोशल मीडियावर केले व्हायरल; 12 तासाच्या आत आरोपी गजाआड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग व मारहाण करून मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करून मुलीची बदनामी करणाऱ्या आरोपीतांना 12 तासाचे आत अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
फिर्यादी यांनी 18 जून 2025 रोजी पो.स्टे. खदान येथे तक्रार दिली की, त्यांचे अल्पवयीन मुलीवर विधिसंघर्षग्रस्त बालक यांनी अतिप्रसंग करून त्यावेळचे मोबाईल मध्ये चित्रीकरण व फोटो काढले होते. तसेच अल्पवयीन मुलीस दुसऱ्या मुलाजवळुन गिप्ट का घेतले या कारणावरून अल्पवयीन मुलीस लाकडी काठीने मारहाण करून सदर घटनेचा व्हिडीओ त्याचे मित्राचे मदतीने तयार करून तो सोशल मिडीयावर प्रसारीत करून मुलीची बदनामी केली. तसेच यापुर्वीचे अतिप्रसंग केलेले फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देवुन मुलीस जबरदस्तीने त्याचे गाडीवर बसवुन फिरायला नेले.
फिर्यादीने दिलेल्या तक्रार नुसार आरोपी विरूध्द पोस्टे खदान येथे अपराध क्रमांक ४८३/२०२५ कलम ६४, ६५, ११८ (१), ३५१ (२), १३७ (१) (ब) ३(५) बि.एन.एस सहकलम ४, १२ पोस्को, सहकलम ३ (१) (आर), ३(१) (डब्ल्यु) (I), (II), ३ (२) (व्हि. ए), ३(२) (व्ही) अ.जा.ज.अ.प्र. कायदा सहकलम ६७ आय टि अक्ट प्रमाणे गुन्हे नोंदविले.
गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोस्टे खदान सोबत पोस्टे डि.बि. पथक अंमलदार यांनी नमुद गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेवुन बारा तासाचे आत गुन्हयातील दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घण्यात आले. तसेच गुन्हयातील इतर आरोपी सलमान खान अयाज खान (वय २४ वर्षे रा. कवाडे नगर अकोला) , अब्दुल साहील अब्दुल वाजीद (वय २० वर्षे, रा कैलास टेकडी अकोला) यांचा शोध घेवुन अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई अर्चित चांडक, पोलीस अधिक्षक अकोला, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांचे मार्गदशनाखाली मनोज केदारे, पोलीस निरीक्षक पोस्टे खदान तसेच निलेश खंडारे, अमित दुबे, नितीन मगर, संजय वानखडे, अभिमन्यु सदांशिव, रोहीत पवार यांनी केली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा