- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-news-khadan-ps: अकोला शहरात धक्कादायक प्रकार उघड ; ‘गे डेटिंग’ ॲप द्वारा बँक अधिकाऱ्यावर सामूहिक अत्याचार; 80 हजार रुपयांनी लूट!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख चढत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा वापरल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन डेटिंग ॲप वरून आतापर्यंत स्त्रियांची फसवणूक झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. आता मात्र पुरुषांची देखील फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. ते सुद्धा 'गे-डेटिंग' ॲपच्या माध्यमातून. या ऑनलाईन गे डेटिंग ॲप वरून चक्क एका बँकेच्या अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करुन आर्थिक लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. ही घटना अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.
गे डेटिंग ॲप्लिकेशन द्वारा आरोपी आणि पीडित यांचा संपर्क आला होता. आरोपींनी बँक अधिकाऱ्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करत त्याचे चित्रीकरण केले आणि नंतर व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करत तब्बल 80 हजार रुपयांची आर्थिक लूट केली. खदान पोलीस ठाण्याने या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर दोन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बँक अधिकारी एका 'गे-डेटिंग' ॲपवर सक्रिय होता. याच ॲपवरून एका व्यक्तीसोबत त्याची ओळख झाली. काही दिवस संवादानंतर 14 जून रोजी हिंगणा फाट्याजवळ प्रत्यक्ष भेट ठरली. तिथे मनीष नाईक नावाचा युवक आला आणि बँक अधिकारी याला त्याने नदीकाठी एका अज्ञात ठिकाणी नेले.
तेथे दोघांनी समलैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर मनीषने आपल्या आणखी तीन साथीदारांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून बँक अधिकाऱ्यावर जबरदस्ती केली. या दरम्यान व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर व्हिडिओच्या आधारे पीडित बँक अधिकारीला आरोपींनी पैसे देण्यास भाग पाडलं. आरोपींची पैश्यांची मागणी वाढत गेल्याने पीडित बँक अधिकारी यांनी पोलीस ठाणे गाठले.
पीडित अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पहिल्या टप्प्यात 30 हजार रुपये देण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर पुन्हा रुपयांची मागणी होत गेली आणि एकूण 79,300 रुपये आरोपींनी पिडीतेकडून घेतले. यानंतर पीडित बँक अधिकाऱ्याने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक मनोज केदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विशेष सापळा रचला. त्यासाठी पीडित अधिकाऱ्याला पुन्हा भेटीची तयारी करावी लागली.
आरोपी मनीष नाईक पुन्हा ठरलेल्या ठिकाणी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यासोबत मयूर बागडे यालाही ताब्यात घेण्यात आले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष नाईक याच्याकडे एक विशेष प्रकारचे इंजेक्शन होते. समलिंगी व्यक्तींना उत्तेजित करण्यासाठी तो हे इंजेक्शन वापरत होता. त्यानंतर अत्याचार केला जात होता.
पोलिसांकडून चौघांच्या इतर गुन्ह्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात अन्य कोणी फसवणुकीचा बळी ठरला असल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.
Akola city
Akola crime
Akola police
Bank officer
Crime news
gay dating app
khadan police station
Shocking incident
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा