high-court-nagpur-murder-case : दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात; खटल्याला विलंब – आरोपीला जामीन मंजूर
high-court-nagpur-murder-case : दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात; खटल्याला विलंब – आरोपीला जामीन मंजूर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाभारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राज्यात मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याला विराम देत सातत्याने मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. सखोल भागामध्ये पाणी साचल्याने रस्त्यांना नदी आणि तलावाचे रूप आले आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अकोला जिल्ह्यात अधूनमधून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. आजच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांतील जवळपास 107 गावे प्रभावित झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेने विदर्भात 31 मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. अकोल्यात उद्या 28 मे आणि 31 मे रोजी वादळ वारासह पाऊस बरसणार असल्याचा पूर्वानुमान आहे. प्रशासनाने नागरिकांना शक्यतो घरातच राहण्याचे आणि गरज असल्यासच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान आज अकोला शहरातील मोहता मिल रोडवरील मासूम शाह कब्रस्थान जवळ पावसामुळे एक मोठे झाड पडल्याची घटना घडली. यामध्ये एक कार अडकली होती. प्राथमिक माहिती नुसार या कार मधे दोन महिला, दोन मुले आणि कार चालक होते. स्थानीक नागरिक आणि आमदार साजीद खान पठाण यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत कार मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. तसेच हे महाकाय वृक्ष रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
विदर्भात उद्याही पाऊस!
स्त्रोत RMC Nagpurनागपूर प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या 28 मे रोजी संपूर्ण विदर्भात जोरदार पाऊस बरसणार आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पश्चिम विदर्भात वादळ वारासह पाऊस तर पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Akola Orange Alert
अकोला शहर, रिधोरा, वाडेगाव, आलेगाव, पातूर, बाळापूर, बार्शिटाकळी, कुरणखेड, महान, पिंजर, माना, कुरूम.
मेघगर्जनेसह पाऊस
पुढील 3 तासांत akola, washim, amravati, yavatmal, chandrapur, nagpur, wardha, bhandara जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याच्या वाऱ्यांसह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.
- मंत्रालय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा