भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ या प्रतिष्ठानातून 2.50 लाखांची साखळी चोरी करून पलायन करणारी 22 वर्षीय युवती अवघ्या सहा तासातच पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपी युवतीकडून पोलीसांनी एकुण 3 लाख 18 हजार 622 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, 8 मे 2025 रोजी दुपारी 12.45 दरम्यान अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रतिष्ठीत मलाबार गोल्ड अँड डायमंड या सोन्याच्या दागीन्याच्या दुकानात चतुराईने ग्राहक बनुन आलेल्या एका अनोळखी महीलने चेह-यावर स्कार्फ बांधुन स्वतःची ओळख लपवुन मलाबार गोल्ड अँड डायमंड येथील सेल्समन फिर्यादी प्रविण बालाजी वडजे (वय 32 वर्षे रा राउतवाडी मधुप्रभा अपार्टमेंट, अकोला) यांना सोन्याची चैन घेण्याचा बहाणा करून फिर्यादी यांनी तिच्या समोर सोन्याच्या चेनचा ट्रे ठेवला.
दरम्यान या महीलेने ट्रे ची पाहणी करतांना फिर्यादी यांची नजरचुकवुन सोन्याच्या चेनच्या ट्रे मधुन चार ग्रॅमची चेन किंमत 42 हजार व 20 ग्रॅमची चेन किंमत 2 लाख 6 हजार 622 असा एकुण 2,48,622 रूपयांचा मुददेमाल चोरून नेला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली.
याबाबत फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून 165/2025 कलम 305 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकता ज्वलेर्स येथे चोरीचा प्रयत्न फसला
दरम्यान एकता ज्वलेर्स येथे याच महीलेने अशाच प्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी महीला एकता ज्वेलर्स येथे चोरी करण्याच्या उददेशाने चेह-याला स्कार्फ बांधुन गेली असता, तेथे हजर असलेल्या जागरूक स्टाफने तिला चेह-यावरील स्कार्फ काढणे बाबत विनंती केल्याने सदरील महीलेने चेह-यावरील स्कार्फ काढल्याने तिचा एकता ज्वलेर्स येथे चोरीचा प्रयत्न फसला.
घटनेचे गांभीर्य पाहुन पोलीस अधिक्षक, अकोला यांचे आदेशावरून स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व पोलीस स्टेशन सिव्हील लाईनचे पोलीस निरीक्षक जयंत सातव यांनी घटनास्थळाला भेट दिली.
स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पोलीस निरिक्षक जयंत सातव यांचेशी चर्चा करून, स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाला पुढील सुचना व मार्गदर्शन केले. त्यावरून या गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथकाने समांतर तपास करून तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदार कामाला लावले. सदर गुन्हा हा कैलास टेकडी येथे राहणारी महीला ईशा सत्यप्रकाश पांडे (वय 22 वर्षे रा. शिव मंदीरा जवळ, कैलास टेकडी, अकोला) हीने केला असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर आरोपी महिला हीचे कडुन तिने मलबार गोल्ड अन्ड डायमंड येथुन चोरी केलेले सोन्याचे दागिने चार ग्रॅमची चैन किंमत 42 हजार व 20 ग्रॅमची चैन किं. 2,06,622/- असा एकुण 2,48,622/- रूपयांचा मुददेमाल तसेच गुन्हयात वापरलेले वाहन टिव्हीएस ज्युपीटर किं.अं. 70,000/- असा एकुण 3,18,622/- चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपी महिलेस सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनचा ताब्यात देण्यात आले आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक धर्माळे व पथक (पो. स्टे. सिव्हील लाईन, अकोला) पुढील तपास करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह , अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतिष कुळकर्णी, पो.नि. जयंत सातव, पो.स्टे. सिव्हील लाईन, पो.नि शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनात पोउपनि माजीद पठाण स्थागुशा. पो. अमंलदार एएसआय गणेश पांडे, पोहेकॉ रवि खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन शेख, मोहम्मद एजाज, अब्दुल माजीद, फिरोज खान, भास्कर धोत्रे, पोकॉ अशोक सोनोने, अमोल दिपके, सतिष पवार, राहुल गायकवाड, मपोहेका तुळसा दुबे चालक पो. हवा प्रशांत कमलाकर यांनी केली आहे.
सराफा व्यवसायीकांना आवाहन
सराफा व्यवसायिकांनी आपल्या सराफा दुकानात स्कार्फ, मास्क व हेल्मेट अशा प्रकारे चेहरा झाकुन येणा-या ग्राहकांशी कोणत्याही प्रकारचे खरेदी व विक्रीचा व्यवहार करून नये. किंवा सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना दुकानात प्रवेश देवु नये. तसेच दुकानात येणा-या ग्राहकांच्या वाहनांचे वाहन क्रमांकाची नोंद ठेवणे बाबत सुरक्षारक्षकाला सुचना देण्यात याव्या, असे आवाहन पोलीस अधिक्षक अकोला व स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांचे कडुन सर्व सराफा व्यवसायीकांना केले आहे.
हायफाय लाईफ स्टाईल जगण्यासाठी या युवतीने चोरी करण्याचा शॉर्टकट मार्ग निवडला असल्याचे समोर येत आहे. मात्र हा तिचा बनाव आहे की तिचा बोलविता धनी आणखी कुणी आहे. यापूर्वीही तिने चोरी सारखे गंभीर गुन्हे केले आहेत का, याबाबत अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा