- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
maharana-pratap-jayanti-2025: महाराणा प्रताप सिंह जयंती निमित्त अकोला शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८५ जयंतीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराणा प्रताप सेवा समितीने सदर शोभायात्रेचे आयोजन केले होते. ‘सुसज्ज रथावर विराजमान महाराणा प्रताप सिंह’ हा सजीव देखावा शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे घोडे, आखाडे, दांडपट्टे यांचाही या शोभायात्रेत सहभाग होता. स्थानिक सिटी कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बाग येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. सदर शोभायात्रा ही टिळक रोड मार्गे कपडा बाजार, जैन मंदिर समोरून गांधी चौक येथे आली. त्याठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. तर गांधी चौक येथून सिटी कोतवाली चौक येथील महाराणा प्रताप बाग येथे शोभायात्रेचे समापन करण्यात आले.
या शोभायात्रेत पृथ्वीराज सिंग चौहान, भोजराज सिंह बैस, प्रदीपसिंह गौर, रघु ठाकूर, चंदन ठाकूर, मुन्ना गौर, रवी ठाकर, चेतन ठाकूर, गिरीधर ठाकूर, बादलसिंह ठाकूर, राजू ठाकूर, संजय सिंह गौर, राजेश चंद्रवंशी, सुंदर ठाकूर, सुमेर ठाकूर, समीर गौतम, सतीश गौतम, के. एन. सिंग, सुरज ठाकूर, विक्की ठाकूर, संदीप ठाकूर, पवन ठाकूर, राम ठाकूर, आकाश ठाकूर, ॲड. दुष्यंत चौहान, ॲड. योगेश ठाकूर, तिलक ठाकूर, तेजसिंह ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, विजय सिंह ठाकूर, समीर ठाकूर, हेमंत ठाकूर, दीपक ठाकूर, निखिल बैस यांच्यासह महाराणा सेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक वेशभूषेत महिला मंडळीची विशेष उपस्थिती
चंदा ठाकूर, नीतू बैस, धन्वंतरी ठाकूर, कल्पना ठाकूर, विद्या बनाफर, सपना ठाकूर, मीना बैस, कल्पना चौहान, दीपिका ठाकूर, मोना चंद्रवंशी, अमिता बैस, दीपाली ठाकूर, पूनम परमार, शीला चौहान, सुनीता गौर, माया चौहान, पूनम परमार, प्राची ठाकूर, डॉली चौहान, गायत्री चौहान, प्रीती बैस, राजवंती सूर्यवंशी, अर्चना बैस, संगीता चौहान, चंदा ठाकूर ( नांदेड), डिंपल बैस, पूजा चंदेल, खुशबू चंदेल, दुर्गा ठाकूर, कांता ठाकूर, कोमल सूर्यवंशी, प्रीती सोमवंशी, पूनम बैस, देवीबाई ठाकूर, शशिकला चंदेल, आँचल पवार, शीतल ठाकूर, शिवानी ठाकूर, काजल ठाकूर, रोशनी ठाकूर, दुर्गा ठाकूर, दिपा ठाकूर, वैशाली ठाकूर, नीतू ठाकूर, योगिता ठाकूर, दीपाली चौहान, संगीता ठाकूर, फुलवा गौर, दीप्ती बैस यांसह महिला मंडळीची मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती होती.
लोकप्रतिनिधींचाही सहभाग
गुरुवारी निघालेल्या शोभायात्रेत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी शोभायात्रेचे टिळक रोड येथे स्वागत करीत आपला सहभाग नोंदविला. तर सिटी कोतवाली चौकात महानगर भाजपच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे, आ. वसंत खंडेलवाल, जयंत मसने, विजय अग्रवाल, अजय शर्मा, संजय गोटफोडे आदी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा