- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
lord-mahesh-navami-2025-akl: महानगरात भक्तिभावाने साजरी होणार भगवान महेश नवमी; पाच दिवसीय उत्सवाची भव्य शोभयात्रेने होणार सांगता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सकल माहेश्वरी समाजाचा वंशोत्पती दिवस म्हणून महेश नवमी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. या वर्षीही 4 जून रोजी सकल माहेश्वरी समाज महेश नवमी उत्सव साजरा करीत आहे. या उत्सवाच्या निमित्त माहेश्वरी भवनात 31 मे ते 4 जून पर्यंत माहेश्वरी समाज ट्रस्ट, महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ तथा वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या महेश नवमी उत्सवात अखिल भारतीय माहेश्वरी सेवा सदनचे अध्यक्ष रामकुमार भुतडा तथा नागपूर इन्कमटॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लोहिया विशेष अतिथी म्हणून तथा पूजा यजमान म्हणून लक्ष्मीनारायण धूत व नूतन धुत उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश नवमी उत्सव प्रमुख विनीत बियाणी यांनी दिली.
माहेश्वरी भवनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया, प्रधानमंत्री विजयकुमार राठी, महिला मंडळ अध्यक्ष शिल्पा चांडक, प्रगती मंडळ अध्यक्ष सुरज काबरा, नवयुवती मंडळाच्या अध्यक्ष नंदिनी बजाज, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठचे अध्यक्ष प्रा. गोपीकिशन कासट, वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या अध्यक्ष प्रमिला लाहोटी आदी उपस्थित होते.
महेश नवमी उत्सवाचा प्रारंभ 31 मे रोजी सकाळी भगवान महेश यांच्या पूजा अर्चना व आरतीने करण्यात येणार आहे. यानंतर प्रगती मंडळाच्या वतीने ‘एक धाव समाजाच्या साठी’ ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पाच वर्षावरील समाजातील सर्व युवक युवतींनी सहभागी व्हावे. 31 मे व 2 जून रोजी देवकीबाई विजयकुमार सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट व आनंद बांगड परिवारच्या वतीने जिल्हा रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालयात फळ वितरण कार्यक्रम होणार आहे. 31 मे रोजी सायंकाळी प्रगती मंडळाच्या वतीने युवकांसाठी ‘उडाण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रविवार 1 जून रोजी सकाळी नवयुवती मंडळाच्या वतीने सर्व वर्गासाठी ‘हॅप्पी स्ट्रीट’ हा कार्यक्रम होणार असून यामध्ये झुंबा, पझल, विविध खेळ राहणार आहेत. या दिनी प्रगती मंडळाच्या वतीने बालकांसाठी विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी महिला मंडळाच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम रसधारा हा कार्यक्रमात होऊन यात नाटिका तथा पारंपारिक नृत्याचा रंगारंग कार्यक्रम होणार आहे.
सोमवार 2 जून व मंगळवार 3 जून रोजी माहेश्वरी समाज ट्रस्ट व आयएमसीसी अकोला शाखाच्या संयुक्त विद्यमाने माहेश्वरी भवन येथे 45 वर्षावरील समाज बांधवांसाठी रक्त व आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. सोमवार 2 जून रोजी दुपारी वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठच्या वतीने वाद विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये ‘विवाह प्रसंगी वाढत चाललेले आधुनिकीकरण’ हा विषय ठेवण्यात आला आहे.
मंगळवार 3 जून रोजी सकाळी समाज ट्रस्टच्या वतीने व राधाकिशन तोष्णीवाल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या सहकार्याने शालेय पारितोषिक व सत्कार कार्यक्रम होणार असून यामध्ये व नर्सरी ते सर्व वर्गाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग शेगावचे प्राचार्य डॉ सुनील सोमाणी तथा राधाकिशन तोष्णीवाल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विनोदकुमार विष्णू तोष्णीवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने "आम्ही पण जीवन जगणे शिकले आहे" या विषयावर एक सुंदर नाटिका व प्रश्नमंजुषा कार्यक्रम होणार आहे. तसेच ट्रस्टच्या वतीने समाजातील नवोदित गायका साठी "मिले सुर मेरा तुम्हारा" हा संगीत कार्यक्रम होणार आहे. या महेश नवमी उत्सव पर्वात माहेश्वरी भवन येथे नित्य सकाळी 9 वाजता व रात्री 7 वाजता सामूहिक आरती कार्यक्रम होणार असून यामध्ये महानगरातील सर्व संस्था, संघटनांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
मुख्य नवमी कार्यक्रम 4 जून रोजी होणार असून या दिनी सायंकाळी 5 वाजता प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत महेश नवमीची भव्य शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा राजराजेश्वर मंदिरापासून प्रारंभ होऊन सिटी कोतवाली, टिळक रोड, जुने कापड बाजार, गांधी चौक, तहसील चौक मार्गे माहेश्वरी भवन येथे पोहोचून येथे मुख्य नवमी कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सर्व कार्यक्रमाच्या सफलतेसाठी माहेश्वरी समाज ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सदस्यगण, महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ, वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठचे सर्व पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत असून या उत्सवात समाजातील महिला, पुरुष, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे प्रधानमंत्री विजयकुमार राठी यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेत यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष शांतीलाल भाला, कोषाध्यक्ष डॉ आशिष पनपालिया, सदस्य पुरुषोत्तम खटोड, प्रमोद लटूरिया, द्वारकादास चांडक, प्रा डॉ रमण हेडा, नंदकिशोर बाहेती, प्रवीण हेडा, सीए मनोज चांडक, प्रा महेश मुंदडा, प्रदीप राठी, एड विशाल लढ्ढा, महिला मंडळ सचिव ज्योती बियाणी, नवयुवती मंडळाच्या एड स्नेहल सावल, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठचे सचिव राजीव मुंदडा, महिला प्रकोष्ठच्या सचिव वीणा राठी आदी उपस्थित होते.
Akola city
grand procession
Indian festival
Lord Mahesh Navami
mahesh navmi 2025
Raj Rajeshwar Temple
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा