- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-regional-transport: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटने घातला गोंधळ; कर्मचारी आणि एजेंट मध्ये हाणामारी, एजंट विरोधात पोलिसात तक्रार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये आज एका एजंटने चांगलाच गोधळ घातला. या एजंटने खंडारे नामक एका कर्मचाऱ्यासोबत कामकाज करण्याच्या कारणावरून वाद घातला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
दरम्यान प्रादेशिक कार्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी खदान पोलीस स्टेशनला एजंटच्या विरोधात तक्रार दिली आहे.
मात्र या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. कार्यालय प्रमुखांची कार्यालयात महिन्यातून काही दिवसच कार्यालयाला भेट असल्याने या ठिकाणी वरिष्ठांचा कोणताच वचक नसल्याने असे प्रकार येथे वारंवार घडत असल्याची कार्यालय परिसरात चर्चा आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 महिन्यात अशीही पाचवी घटना घडली आहे.
New update
दरम्यान, आरटीओ कार्यालयात घडलेल्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख रेहान शेख गफूर यांची प्रकृती गंभीर असल्याने अकोला सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी नागपूरला पाठवले असल्याचे कळते.
आजच्या या घटनेमुळे आता आरटीओ अधिकारी- कर्मचारी विरुध्द आरटीओ एजेंट असा हा वाद अधिक चिघणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा