- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
four-wheeler-hits-auto-ricksha: चुकीच्या बाजूने चारचाकी गाडी चालवून ऑटोरिक्षाला धडक; ऑटोरिक्षाचे नुकसान, प्रवासी जखमी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : चुकीच्या बाजूने चारचाकी गाडी चालवून एका ऑटोरिक्षाला धडक देऊन पळ काढल्यानंतर कार चालकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चारचाकी गाडी उभी करून येथून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे.
विरुद्ध दिशेने चार चाकी गाडीने ऑटोला धडक दिल्याने ऑटोचा सुमारे एक लाखाचा नुकसान झाला आहे. तर यातील प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत. ऑटोला धडक देऊन पळ काढणारा गाडी मालक दारूच्या नशेत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आल आहे. तर हा व्यक्ती मोठा अधिकारी असल्याचं उपस्थितांनी म्हटलं आहे. रिक्षा चालकाने अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात कार चालकाविरुद्ध तक्रार दिली असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहे.
टॉवर जवळील स्टेट बँक ऑफ इंडीया जवळ हा अपघात घडला. ऑटो चालक हा बस स्टन्डच्या दिशेने जात होता तर चार चाकी गाडी WRong साईडने टॉवरच्या दिशेने जात होती.
गाडी चालवणारा व्यक्ती हा दारूच्या नशेत असावा, असं तक्रारीत म्हटलं आहे. मात्र गाडी चालक फरार झाल्याने तो नशेत होता किंवा नाही याचा तपास करणे आता कठीण होणार असल्याचे म्हंटले जात आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा