ncp-meeting-bjp-akola-west: विजय अग्रवाल यांच्या विजयासाठी विजय देशमुख मैदानात!




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: हॉटेल मीरा येथे आज अकोला पश्चिम विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची संवाद बैठक पार पडली. विजय अग्रवाल यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगर अध्यक्ष विजय देशमुख मैदानात उतरले असून, या बैठकीत रणनिती आखण्यात आली.



विजय अग्रवाल यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी एकजूटाने काम करण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. बैठकीत आगामी निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात आली. तसेच प्रचाराची तयारी व कार्यक्षेत्रांची आखणी करण्यात आली. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पक्षांमध्ये सामूहिक एकतेची महत्त्वाची भूमिका उचलली. या बैठकीमुळे महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला, जो आगामी निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


याप्रसंगी महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगर अध्यक्ष विजय देशमुख, भाजपा महानगराध्यक्ष जयंतरावजी मसने, दिलीप देशमुख ,गौतम गवई, अजय रामटेके ,मनोज गायकवाड ,यश साहू, दिलीप मिश्रा, सुधीर कहाकर ,संतोष डाबेराव, मुन्ना ठाकूर ,अनिल मालरा, आकाश इंगळे ,अशोक परळीकर, फरास खान, नकीर खान, वैभव घुगे, रहीम पेंटर, अजय मते, याकूब पहिलवान ,नितीन शिरसागर, अक्षय जटाले, सोनू इंगळे यांच्यासह महायुतीच्या विविध घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



टिप्पण्या