- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
congress-leader-rahul-gandhi: 15 नोव्हेंबरला काँग्रेसनेते खा. राहुल गांधी यांची तोफ अकोल्यात धडाडणार!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
महाविकास आघाडीचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारार्थ सभा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी देणारे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते खा राहुल गांधी यांची तोफ अकोला 15 नोव्हेंबर रोजी धडाडणार आहे.
काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्या प्रचारासाठी 15 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार असून, या सभेला अकोला पश्चिम मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार साजिद खान पठाण यांनी केले आहे.
2004 नंतर गांधी परिवारातील सदस्यांची पहिल्यांदा अकोला येथे सभा होणार असल्याने या सभेला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. हे विशेष !
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, विधानसभा पश्चिम विदर्भ निरीक्षक कमलेश्वर पटेल अकोला जिल्हा प्रभारी यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. महेश गणगणे, नितीन देशमुख, गोपाल दातकर, सम्राट डोंगरदिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा