- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ संवाद सभा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पश्चिम विधानसभा मतदार संघाचा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी आज अनिकट येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रा वाघ यांनी नागरिकांचा प्रतिसाद बघता नक्कीच अकोला पश्चिम मध्ये कमळ फुलणार असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी माजी महापौर अर्चना मसने , वैशाली शेळके,संतोष पांडे, चंदा शर्मा ,अजय शर्मा, विनोद मनवानी, चंदाताई ठाकूर, जानवी डोंगरे ,सिद्धार्थ शर्मा, सुरेंद्र चव्हाण, देवेंद्र तिवारी ,संजय गोटफोडे, अनुप शर्मा, पवन महल्ले, विकी ठाकूर ,विनीत पांडे ,नितेश पाली, पवन गेडाम, प्रवीण ठाकूर, विजय कांबळे आदि महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
अकोला शहरातील पोळा चौक येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी संवाद बैठक घेऊन नागरिकांशी सुसंवाद साधला व जनतेचे आशीर्वाद घेतले.
यावेळी या भागात केलेल्या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भागांमध्ये अनेक विकासकामे आपण पूर्णत्वास आणली असून येणाऱ्या काळातही येथील परिपूर्ण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. आपले प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद सदैव कायम राहू द्या, अशी विनंती यावेळी नागरिकांना केली.
याप्रसंगी दिलीप मिश्रा,नितीन ताकवले, रमेश गावंडे, बंडू मालगे, रमेश मेहरे, राजेश्वर फाले, योगेश धनोकार, राजेश धनोकार, प्रदीप बनवे, वामनराव मुळे, छोटू सरदार, सुभाष वानखडे, यश जाधव, शिव ढवळे, उमेश गुजर, युवराज राठोड, अमोल गोगे, यश दांगला, रमेश पाचपोर, सुशील महोरे, किशोर गायकवाड, चेतन साहू, दिलीप नायसे, करण साहू, अरविंद शुक्ला, राजेश पंढरी, प्रवीण झापर्डे, आशिष पंजवानी व महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
रवी नगर येथे भेट
संवाद दौऱ्यानिमित्त भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल रवी नगर येथे भेट दिली व येथील नागरिकांशी संवाद साधला
पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी येणाऱ्या 20 नोव्हेंबरला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले.
यावेळी श्रीरंग पिंजनकर, सुमन गावंडे, बादलसिंग ठाकूर, विजय इंगळे, गजानन पावसाळे, बिलल परेल, पप्पू चौधरी, संतोष अनासाने, संदीप पतकी, स्वप्निल देशमुख, कुणाल शिंदे, सुनील मदनकार, अरविंद शुक्ला, कुणाल पिंजरकर, नितीन देशमुख, सचिन कराडे, आदी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंधी कॅम्प
काल सिंधी कॅम्प येथे संवाद दौऱ्या निमित्त महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी भेट दिली येथील नागरिकांशी संवाद साधला.अकोल्याच्या प्रगतीसाठी नवीन योजनांचा संकल्प केला. हरिहर पेठ येथे नागरिकांनी भाजपवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. “आपल्या नेतृत्वाखाली आम्ही अधिक सुरक्षित, प्रगत, आणि समाधानकारक जीवन जगत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी, महिला व तरुणांनी विकासाच्या उपक्रमांसाठी सहकार्याचे वचन दिले. “भाजप हाच विकासाचा खरा मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी सिद्धार्थ वरोठे, सुजित ठाकूर, संजय बडवणे, विनोद मनवानी, पुरुषोत्तम पानझडे, सुनील उगले, पवन महल्ले, महेंद्र गोटखडे, अरविंद शुक्ला, प्रीतम ठाकुर, प्रवीण पळसकर, हिरा गायधने, अक्षय गायकवाड, दीपक शिरस्कार, हर्ष मांडलेकर, आशिष वाघवाणी, सागर बनसोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा