- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-west-assembly-election: अकोला पश्र्चिम: वंचितचे टार्गेट आता केवळ काँग्रेस; राजेश मिश्रा, अशोक ओळंबे की हरिश अलीमचंदानी ? कुणाला मिळणार पाठिंबा… !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिशान हुसैन यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने वांचितची मोठी गोची झाली आहे. यानंतर मात्र वंचितने आता काँग्रेसला टार्गेट केलं आहे. वंचितच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी मुस्लिम धर्मगुरूची मध्यस्थी करण्यात आली असून, झिशान हुसैन यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याच लेखी आश्वासन देण्यात आलं आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार देखील झाला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यानी पत्रकार परिषदेत केला आहे.
अकोला पश्चिमच्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराला मतदारांनी मतदान न करण्याचं आवाहन यावेळी वंचित नेत्यांनी केले.
तिघांपैकी कोण?
अकोला पश्चिम मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून कोणाला पाठिंबा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजेश मिश्रा, हरिष अलीमचंदानी आणि डॉ. अशोक ओळंबे यांचा विचार वंचित गोटात सुरू असल्याचे कळते. या तिघांमध्ये वंचितला हरिश अलीमचंदानी सरस वाटत आहेत. मात्र, या तिघांपैकी जो उमेदवार भाजप किंवा काँग्रेस सोबत जाणार नाही, त्याच उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी आपला पाठिंबा देईल, असे पुंडकर यांनी स्पष्ट सांगितले.
कट्टरवाद्यांना थारा नाही
अकोला जिल्ह्यामध्ये एक दीड वर्षात जातीय दंगलींचे प्रमाण वाढले आहे. या दंगलींमध्ये निष्पाप बळी गेले. संचार बंदीमुळे जन सामान्यांना उपाशी राहावे लागले. सण उत्सवावर दुःखाचे सावट पसरते. त्यामुळे यापुढे वंचित बहुजन आघाडी कोणत्याही कट्टरवादी उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे प्रा. पुंडकर म्हणाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा