- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
vba-sugat-waghmare-mtz-akl: विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर; मुर्तिजापूर मतदार संघासाठी उद्योजक सुगत वाघमारे यांचे नाव घोषित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या 16 उमेदवारांची पाचवी यादी आज सायंकाळी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये मुर्तिजापूर विधानसभेसाठी उद्योजक बांधकाम व्यवसायी डॉ. सुगत वाघमारे यांचे नाव घोषित केले आहे. वाघमारे यांनी मुर्तिजापूर मतदार संघावर आधी पासूनच दावा केला होता. यासाठी त्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम मतदार संघात राबविले.
या पाचव्या यादीत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या मतदारसंघात सुगत वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाघमारे यांनी या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली होती.
यापूर्वी वंचित कडून बाळापूर मतदारसंघासाठी काँग्रेस मधून आलेले नतिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान आतापर्यंत वंचितचे राज्यातील 83 उमेदवार तर अकोला जिल्ह्यातील दोन उमेदवार जाहीर झाले आहे.
अशी आहे पाचवी यादी
यांच्या नावाची घोषणा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा