- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
murder-case-balapur-river-: निर्दयी बापाने चिमुकल्यांची हत्या करून मृतदेह फेकले नदीत; मृतदेह शोधकार्य सुरू, आरोपी अटकेत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*बाळापूर शहराजवळील घटना
*निर्दयी बाप बुलढाणा जिल्ह्यातील कदमापूरचा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा नजीक असलेल्या लोणी कादमापूर येथे एक हृदय पिळविणारी घटना उघडकीस आली आहे. निर्दयी बापानेच सात वर्षीय कुमारी सदफ व नव वर्षीय कुमारी आलिया या दोन चिमुकल्यांची हत्या करून मृतदेह बाळापुर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील मन नदीमध्ये फेकल्याची घटना समोर आली आहे.
कदमापूर येथील शेख हारून शेख शब्बीर यांनी दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार आज दुपारी पोलिसात दिली होती, हे विशेष.
दरम्यान दोन्ही मुलींना अटाळी येथून ऑटो रिक्षात बसून दिले होते, हारून याने असे सांगितले होते. परंतू पोलिसांना शेख हारून याच्या बोलण्यावरून त्याच्यावरच संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत पहिले उडवाउडवीचे उत्तरे हारूनने दिले. मात्र पोलीसांनी मुसक्या आवळताच त्यानेच आपल्या मुलींचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे.
यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक करून घटनास्थळी घेवून गेले. यावेळी हारुन याने दाखविलेल्या बाळापुर येथील बायपासवरील नदीमध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह शोधण्यासाठी खामगाव ग्रामीण, हिवरखेड व अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चिमुकल्यांची हत्या करण्यामागील कारण आरोपीने अद्याप स्पष्ट केले नाही. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा