- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील मुर्तिजापूर पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी शहरात आयोजित एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान एक दुचाकी चोरीला गेली होती. या दुचाकी चोराचा शोध घेतला असता मुर्तिजापूर पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकला असता या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल आठ चोरीच्या दुचाकी गाड्या सापडून आल्या. आरोपीने मुर्तिजापूर शहरातून 4 गाड्या चोरी केल्या आहेत तर 4 गाडी चालकांचा शोध पोलीस घेत आहे. तर अटक करण्यात आलेल्या चोरट्याने आणखी काही गाड्यांची चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करीत आहे.
अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात मुर्तिजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा