- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
mitkari-car-vandalism-case: आमदार मिटकरी कार तोडफोड प्रकरण: हॉटेल आर. जी. मधून पाच आरोपी मनसे सैनिकांना अटक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपी सचिन गालट या मनसैनिकासह 5 जणांना अकोला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी हॉटेल आर. जी. येथून अटक केली आहे.
आज मनसे युवा नेता अमित ठाकरे यांचा अकोला दौरा असून ते याच हॉटेलमध्ये थांबणार असल्याने मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथे जमा झाले होते. यामध्ये आमदार मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणातील आरोपी देखील होते.
दोन दिवसांपूर्वी सचिन गालट सह अन्य मनसे सैनिकानी अमोल मिटकरींच्या गाडीचा काच फोडला होता. या घटनेनंतर 13 मनसे सैनिकांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी तीन मनसे सैनिकांना पोलिसांनी आधी अटक केली होती आणि त्यांना न्यायालयाने जामीन सुद्धा दिला आहे. आज सचिन गालट सह ललित यावलकर, अरविंद शुक्ला, मुकेश धोनफळे, रुपेश तायडे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा