- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
death-woman-electric-shock : इलेक्ट्रिक मोटरचा झटका लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यु; डाबकी रोड परिसरातील घटना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : पाणी टंचाई असल्याने अकोला शहरात सध्या 8 दिवसाआड मनपा द्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ज्या दिवशी पुरवठा होतो त्या दिवशी पाणी भरण्यासाठी महिलांची घाई गडबड सुरू असते. अशातच आज अकोला शहराच्या डाबकी रोड गजानन नगर परिसरात पाणी भरण्यासाठी नळाला इलेक्ट्रिक मोटार पंप लावताना एका तरुणीचा विद्युत झटका लागून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संजना करण अंभोरे असे मृत युवतीचे नाव असल्याचे समजते.
पाण्याचा फोर्स येण्यासाठी अनेकजण नळाला इलेक्ट्रिक मोटर लावतात. अकोला शहरात ही घरोघरी नित्याची बाब झाली आहे. आज गजानन नगर या भागात जल पुरवठा झाल्याने नळाला अधिक पाणी येण्यासाठी एका 19 वर्षीय तरुणीने नेहमी प्रमाणे इलेक्ट्रिक मोटर लावली. मात्र आज मोटरच्या विद्युत करंट लागल्याने धक्क्याने ही तरुणी दूर फेकल्या गेली.
यानंतर या तरुणीला कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा