- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
political-party-ncp-letter-book: आमदार मिटकरी यांच्या वाढदिवस निम्मित लेटरबुक तुला; राकाँ नेते संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम साकार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाढदिवस निमित्त मंगळवारी त्यांच्या चाहत्यां तर्फे लेटरबुक तुलाच आयोजन स्थानिक हॉटेल मध्ये केले होते. तुला केलेल्या वही पुस्तकांचे वाटप बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. पुस्तक तुलाची संकल्पना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी मांडली होती.
शिक्षणापासून गरीब विद्यार्थी वंचित राहायला नको, यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली होती. संदीप पाटील यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतूक होत आहे. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी संदीप पाटील यांचे आभार मानले.
बाळापूर मतदार संघातून संदीप पाटील यांची उमेदवारी!
याप्रसंगी आपल्या भाषणात, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत अकोला आणि वाशिम मिळून 7 ते 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्या, अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली. याचवेळी अमोल मिटकरी यांनी बाळापूर मतदार संघातून संदीप पाटील यांची उमेदवारी सुद्धा जाहीर करून मित्रपक्ष भाजपला संभ्रमित केल आहे. संदीप पाटील यांना AB फॉर्म मीच देणार असल्याचं देखील मिटकरी यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला संदीप पाटील आणि त्यांच्या मित्र परिवारासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा