- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Lok-Sabha-Election-Result- 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपविला राजीनामा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Photo courtesy: X
भारतीय अलंकार न्यूज 24
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा आज दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केला सादर केला आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याची दाट शक्यता आहे. यासाठी एनडीएने सत्ता स्थापन करण्यास हालचाली सुरू केल्या असून येत्या 8 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान आज नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपविला आहे. एनडीए बैठकीआधी लोकसभा भंग करण्याची औपचारिक माहिती देण्यासाठी नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात गेले होते. तसेच राजीनामा देखील सोपविला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 7 जून रोजी दुपारी 2.30 वाजता संसद भवनात एनडीएच्या खासदारांची बैठक होणार असून या बैठकीला एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. तसेच नव्याने निवडून आलेले खासदार सुध्दा दिल्लीकडे रवाना होत आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
photo courtesy: X- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा