- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: दगडी पूल परिसरातून सोमवारी रात्री अपहरण झालेले व्यापारी अरुणकुमार मगनलाल वोरा (रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला) अखेर बुधवारच्या रात्री साडे बाराच्या सुमारास घरी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा चालकाने कान्हेरी सरप येथून त्यांना आणले. त्यांचे कपडे मातीने भरल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहे. या संपूर्ण घटनेचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाच संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून, त्यात एक त्यांच्या ओळखीतला असल्याचे समजते.
दोन दिवस उलटूनही अरुण वोरा यांचा काहीच सुगावा लागत नसल्याने. त्यांचा शोध त्वरित लागावा यासाठी त्यांच्याबाबत माहिती देणारे व्यक्तिस अकोला पोलीसांनी 25,000 रुपयेचे ( पंचवीस हजार रूपये) बक्षीस जाहीर केले होते.
पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला अंतर्गत येणारे चार जिन दगडी पुलाजवळील काचेच्या बॉटल विकत घेणारे व्यापारी अरुणकुमार मगनलाल वोरा (रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला) यांचे 13 मे रोजी रात्री अंदाजे 9 ते 9.30 वाजताचे सुमारास अपहरण झाले होते. त्यांचे चार जिन दगडी पुल जवळील गोडावुन बंद करून घरी जाण्यासाठी त्यांची मोपेड गाडी उभी करण्याचे ठिकाणी गेले असता त्यांना 2 ते 3 अनोळखी ईसमांनी जबरदस्तीने ओढत नेवुन एक जुनी पांढ-या रंगाचे कार मध्ये जबरदस्ती कोबुंन घेवुन गेले होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा