lok-sabha-election-2024-akola: डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ मुकूल वासनिक आज अकोल्यात; पातूर आणि अकोला शहरात होणार जाहीर सभा





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव, गुजरात प्रभारी तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक यांचे आज शनिवार 20 एप्रिल रोजी अकोला येथे आगमन होत आहे. महाविकास आघाडीचे अकोला लोकसभा उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ लोकप्रिय नेते मुकूल वासनिक हे अकोल्यात येत आहेत.




शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 11-30 वाजता हेलिकॉप्टर द्वारे खा. मुकुल वासनिक यांचे पातूर येथे आगमन होणार आहे. डॉ अभय पाटील समवेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पातुर मधील सिदाजी महाराज मंगल कार्यालय परिसरात जाहिर सभेचे आयोजन केले आहे. 


त्यानंतर दुपारी 2- 30 वाजता त्यांचे अकोला महानगरात आगमन होणार असून, महानगरातील विविध परिसरात खा. मुकुल वासनिक प्रचार अभियान राबवणार असून महानगरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समवेत त्यांच्या प्रचार सभा ठिकठिकाणी आयोजित केल्या आहेत. अकोला शहरात सायंकाळी 6 वाजता युसुफ अली अंजान चौक, अकोट फैल येथे जाहीर सभा होणार आहे.



या प्रचार दौऱ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, भीमशक्ती, शेतकरी कामगार पक्ष आदी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे. 






.



टिप्पण्या