hanuman-janmotsav-akl-2024: हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातून निघणार हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा ; बाल हनुमान वेशभूषा स्पर्धा ठरणार यंदाचे आकर्षण





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राज राजेश्वर नगरीत मागील आठ वर्षापासून दरवर्षी हनुमान जयंतीच्या पर्वावर जन्मोत्सव उपक्रम व भव्य शोभायात्रा आयोजित करणाऱ्या हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येवर महानगरात हनुमंताची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चालती फिरती हनुमंताची झाकी तथा बाल हनुमंत वेशभूषा स्पर्धा उत्सवाचे आकर्षण राहणार असल्याची माहिती श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद शुक्ला यांनी दिली.


हनुमान जन्मोत्सव समितीचे मुख्य संयोजक अविनाश देशमुख, जेष्ठ समाजसेवी रामप्रकाश मिश्रा, मार्गदर्शक माजी आमदार बबन चौधरी, समितीचे अध्यक्ष अरविंद शुक्ला, रमाकांत खेतान, प्रा.संतोष हुसे, पंकज साबळे, सागर कावरे, मनोज शाहू यांच्या नेतृत्वात हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे.


समितीच्या वतीने मंगळवार 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तर हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवार 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता श्री राजराजेश्वर मंदिरापासून  शोभायात्रा काढण्यात येणार आहे.  शोभायात्रा जयहिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक अशी मार्गक्रमण करीत वसंत टॉकीज मार्गे सिटी कोतवाली परिसरातील हनुमान मंदिराजवळ पोहचणार. याठिकाणी  हनुमान पूजन व महाआरती करुन शोभायात्रेचे भक्तिभावात समापन करण्यात येणार असल्याचे अरविंद शुक्ला यांनी सांगितले. 





शोभायात्रेत हनुमंताच्या प्रतिमेस रथात विराजमान करून हा रथ भक्ताद्वारे ओढण्यात येणार आहे. तसेच शोभायात्रेत चालती फिरती हनुमंताची सजीव झाकी हे आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. दोनशे महिला भजनी मंडळ, दोनशे टाळकरी मंडळ व रामनामाचा गजर करीत असणाऱ्या महिलांची विशेष चमू यात राहणार आहेत. शोभायात्रेत महानगरातील हनुमान भक्तांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन अरविंद शुक्ला यांनी केले.





चिमुकल्यांसाठी मोफत बाल हनुमान वेशभूषा स्पर्धा 




हनुमान जन्मोत्सव निमित्त समितीच्या वतीने चिमुकल्यांसाठी मोफत बाल हनुमान वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा गांधी चौक येथे समितीच्या स्वागत मंडपात घेण्यात येईल. यामध्ये विजेत्या बाल स्पर्धकास रोख 5 हजार रुपये तथा उपविजेत्या बालकास रोख 3 रुपये पारितोषिक देण्यात येणार असून, सहभागी सर्व बालकांना सहभाग पत्र बहाल करण्यात येणार आहेत. सोळा वर्षे वयोगटाच्या आतील बालकांनी  स्पर्धेसाठी दिनेश लोहका, अंकुश तवर, संगिता आत्राम यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन अरविंद शुक्ला यांनी केले.



हनुमान जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी अजय गावंडे, आनंद वानखडे, राजेश राऊत, आकाश कवडे, अंकुश भेंडेकर, विशाल डिक्कर, योगेश बुंदेले, निशिकांत बडगे, पराग कांबले, विनोद नालट, अश्विन पांडे, दत्ता देशमुख, आशीष ढोमणे, गोविंद बागडी, गणेश कलसकर, ॲड. ओम खंडारे, संजय देशमुख, अश्विन देशमुख, अंकुर तायडे, कार्तिक पोडाले, निशांत जाधव, प्रकाश जड़िया, आकाश ठाकुर, ॲड. अनिल शुक्ला, निरंजन चव्हाण, राजाराम मात्रे, सागर पिंपले, प्रितेश ठाकरे, गजानन ढोरे, देशमुख, विनोद मराठे, संगीता आत्राम, जया देशमुख, सविता आढाव, वर्षा शिंदे वंदना गोमासे, आकांक्षा गोमासे आदी परिश्रम घेत आहेत.




.

टिप्पण्या