- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्यापिढीला जाणून घेता यावा, गड-किल्ल्यांची माहिती व्हावी, या हेतूने अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात शिवसृष्टी साकारण्यात आली.
जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोलाशिवजयंती निमित्त चार दिवस अकोला जिल्ह्यातील अकोट येथील शिवाजी महाविद्यालयात शिवसृष्टीचे दर्शन घडविण्यात येत आहे. यामध्ये शिवकालीन सामाजिक व सांस्कृतिक जीवनदर्शन घडविले. प्रदीर्घ अंधाऱ्या कालखंडातून हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशेचा किरण दाखविणारा महाप्रतापी तेजस्वी सूर्य महाराष्ट्रात जन्माला आले ते म्हणजे शिवाजी राजे. त्याच्या आयुष्याचा जीवनपट थरारक, साहसी आणि गनिमी कावाने शत्रूला नामोहरम करण्याच्या घटनांचा देखावा येथे साकारण्यात आला असल्याची माहिती प्रधानाचार्य सुनील पांडे यांनी दिली.
शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग शिवजन्म, राजमाता जिजाऊ शिवबांना धडे देतांना, स्वराज्याची शपथ, अफझलखानाचा वध यासह शिवकालीन बाजार आदी शिवकालीन संस्कृतीचे दर्शन या माध्यमातून देखावे सादर करण्यात आले. नवीन पिढीला हे सर्व पाहून आपण शिवकाळात गेलो असल्याची अनुभूती मिळाली,अश्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा