akl-crime-theft-grocery-store: वाशिम बायपास चौक परिसरातील किराणा दुकानात चोरी; चोरटे सीसीटिव्हीत कैद




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला : बुधवारच्या रात्री अकोला शहरात दोन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्या. शहरातील मध्यवर्ती भागातील ठोक बाजार अलंकार मार्केट मधील सहा ते सात दुकाने चोरट्यांनी फोडली. ही घटना ताजी असतानाच वाशिम बायपास चौकातील किराणा दुकानात चोरी झाल्याची घटना घडली असल्याचे वृत्त पसरले. या दोन्ही घटनामुळे व्यापारी वर्गासह सामान्य नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.



आज गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास वाशिम बायपास रोडवरील असलेल्या संतोष किराणा शॉपमध्ये चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी हे दूकान फोडून दुकानातील हजारो रुपये चोरून पसार झाले. चार अज्ञात चोरटे हे दोन बुलेट गाडीने आले आणि चोरी करून पळून गेले. दोन चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर तोडून आता प्रवेश केला आणि गल्ल्यातील पैसे घेऊन पसार झाले. हा संपूर्ण घटनाक्रम  दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाला आहे. यात चोरटयांनी तोंडाला रुमाल बांधलेली दिसत आहे.


दुसऱ्या घटनेत शहरातील मध्यभागी असलेल्या अलंकार मार्केटला सुद्धा या चोरट्यांनी निशाणा बनवला. या मार्केट मधील 6 दुकानांची शटर तोडून लाखोची चोरी या चोरट्यांनी केली आहे. या प्रकरणी आता अकोला पोलीस अधिक तपास करीत आहे.

टिप्पण्या