jabba-locked-up-in-akola-jail: यवतमाळचा कुख्यात जब्बा अकोला कारागृहात बंद




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या यवतमाळ शहर व परिसरातील कुख्यात गुन्हेगाराविरूद्ध एमपीडीएच्या प्रस्तावाचा आदेश पारित झाला आहे. वृषभ उर्फ वृषिकेश उर्फ जब्बा उमेश वानखडे (वय 24 रा. रामकृष्णनगर, मुलकी यवतमाळ) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्हेगाराची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली आहे. 


जब्बा विरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे आहेत. त्याच्या गुन्हेगारी आलेख 2018 पासूनचा आहे. जबरी चोरी, जखमी करणे, जीवाने मारण्याची धमकी देणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, संपत्तीचे नुकसान करणे, घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे अशा अनेक गुन्ह्यांची यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंद आहेत. 



यवतमाळ व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे जब्बाला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सादर केला होता. 

पोलिसांच्या या अहवालाच्या आधारे अनुषंगाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी देत गुरूवार  11 जानेवारी रोजी स्थानबद्धतेचा आदेश काढला. 



जब्बाला आता अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या