akola crime news: अकरा वर्षीय मुलीला अमानुष मारहाण; आरोपी सावत्र भावाविरुद्ध गुन्हा दाखल





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : 11 वर्षीय  मुलीला तिच्या 25 वर्षीय सावत्र भावाने अमानुषपणे मारहाण केल्याची खेदजनक घटना शनिवारी उघडकीस आली.




सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने चोरी केल्याचा आरोप तिच्या वहिनीनी केला होता. यानंतर तब्बल तीन दिवस मुलीच्या सावत्र भावाने मुलीला अमानुष मारहाण करत एक खोलीत डांबून ठेवलं. ही बाब शेजारच्यांना माहीत पडली आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यां सोबत संपर्क साधला. वंचितने पोलिसांना सोबत घेऊन थेट घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली.पोलिसांनी आरोपी सावत्र भावा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  



मारहाणीत गंभीर रित्या जखमी झालेल्या मुलीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करत आहे, अशी माहिती धनंजय सायरे, पोलीस निरीक्षक,खदान पोलीस स्टेशन यांनी दिली.






सावत्र भावाला खदान पोलिसांनी केली अटक केली असून, खदान पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध भा दं वि कलम 323, 324, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 




टिप्पण्या