akola police: अकोला जिह्यातील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी; पाचशेहून अधिक वाहनांची तपासणी




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला : जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन तसेच संवेदनशील ठिकाणी व मिश्रवस्ती मध्ये कोम्बींग ऑपरेशन १२ डिसेंबरचे रात्री १० वाजता पासुन ते १३ डिसेंबर पहाटे ५ वाजेपर्यंत राबविण्यात आले. 




कार्यवाही मध्ये अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला तसेच जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सह एकुण ४३ अधिकारी व ३४८ अंमलदार यांनी कोम्बींग ऑपरेशन राबवुन  कार्यवाही केली आहे. 






यामधे  कलम १२२ मपोका प्रमाणे एकुण ०९ केसेस,  भारतीय हत्यार कायदयान्वये एकुण ०९ केसेस, कलम ३३ आर डब्लयु मपोका प्रमाणे ०८ केसेस,  कलम ११०,११७ मपोका प्रमाणे ४४ केसेस,  कलम १०२,११७ मपोका प्रमाणे ०२ केसेस, १६५ समन्स, ४४ जमानती वॉरंट, २७ पकड वॉरंट तामिल केले,  महा. दारूबंदी अधिनियम अंतर्गत एकुण १९ केसेस करण्यात आले आहे. महा. जुगार अधिनियम अन्वये ०१ केस,  नाकाबंदी दरम्यान एकुण ५८९ वाहने चेक करून त्यांचेवर मोटार वाहन कायदयान्वये १३२ केसेस करून ५९६०० रू. चा दंड आकरण्यात आला आहे. तसेच अभिलेखावरील ७७ गुन्हेगांराना चेक करण्यात आले आहेत. या कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पो.स्टे अकोट फाईल येथे दाखल अप कं ५३५/२०२३ कलम ४५२, ३२६, ५०४,५०६ भांदवि मधील आरोपी  राहुल मोहन रंधवे, वय २३ वर्ष रा. रामदासमठ अकोट फाइल अकोला यास अटक करण्यात आली आहे.





हे कॉम्बींग ऑपरेशन हे संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, अकोला, अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला जिल्हा, तसेच सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी राबविले आहे.

टिप्पण्या