- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
nagpur university wrestling team: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुस्ती संघ मोहाली चंदीगडला रवाना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३
सतीश भालेराव
नागपूर: २८ नोव्हेबर ते १ डिसेंबर या कालावधीत मोहाली येथे होणाऱ्या दक्षिण पश्चिम झोनल कुस्ती स्पर्धेकरीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा फ्री स्टाईल व ग्रिकोरोमन पुरुषाचा, महिलाचा कुस्ती संघ रेल्वेने चदिगड येथे रवाना झाला.
विद्यापिठाच्या वतीने या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नीलेश राऊत यांची नियक्ती करण्यात आली. तसेच संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.चंद्रशेखर गमे यांची नियुक्ती करण्यात आली. सहायक प्रशिक्षक महेश काळे या संघात विविध वजन गटात प्रामुख्याने संजय मोहारे, मयूर चौधरी, यश कोतागले, अंशुल कुंभलकर, अजय वडे, कल्याणी मोहारे, अशिता मनोहारे, निकिता लांजेवार, अंजली गजभिये, रेणू देशमुख, संस्कृती चौधरी, सौरभ घुमनखेडे, साक्षी कडूकर संघ रवाना होताना स्टार रेसलिंग एकेडमीचे अध्यक्ष दिलीप इटनकर, गोवर्धन वरठी कुस्ती कोच, यांनी प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, खेळाडूना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवशी, डॉ.सुरेंद्र तिवारी, डॉ.प्रवीण पाटील यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनदन केले व शुभेच्छा दिल्या.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा