kanchantai gadkari in akola: कांचनताई गडकरी यांनी घेतले अकोल्यात श्री राजराजेश्वराचे दर्शन




ठळक मुद्दे 

*अकोल्यात साधला मान्यवरांशी संवाद

*आमदार वसंतजी खंडेलवाल यांची उपस्थिती

*आदर्श गोसेवा प्रकल्पाला दिली सदिच्छा भेट






भारतीय अलंकार 24

अकोला : भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सुविद्य पत्नी  कांचनताई गडकरी यांनी शनिवारी अकोल्यात मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल उपस्थित होते.

         

'संस्कार भरती' तर्फे येथील खंडेलवाल भवनात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी कांचनताई गडकरी शनिवारी अकोल्यात आल्या होत्या. या कार्यक्रमापूर्वी आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी त्यांचे आगमन झाले. खंडेलवाल परिवाराने त्यांचे स्वागत केले. याच ठिकाणी त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. 





         

दुपारी त्यांनी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराचे दर्शन घेतले. श्री राजेश्वराचे पूजन करून त्यांनी श्री शिव शंभोंचे आशीर्वाद घेतले. 





यानंतर त्यांनी पातूर रोडवरील म्हैसपुर येथील आदर्श गोसेवा प्रकल्पाला भेट दिली. त्याठिकाणी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. 





या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आमदार वसंत खंडेलवाल त्यांच्यासोबत उपस्थित होते.

टिप्पण्या