- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राज राजेश्वर यांचे आज बुधवारी संध्याकाळी पं प्रदीप महाराज मिश्रा यांनी दर्शन घेतले. महाराजांनी यावेळी एक लोटा जल शिवपिंडवर अर्पण केले.
पं प्रदीप महाराज मिश्रा हे स्वामी समर्थ श्री शिवमहापुराण कथेसाठी गेल्या 5 मे पासून म्हैसपूर येथे आले आहेत. त्यांच्या कथेला लाखों भाविकांनी प्रतिसाद दिल्यानंतर उद्या 11 मे रोजी श्री शिव महापुराण कथेची पूर्णाहुती करणार आहेत. त्यापूर्वी आज संध्याकाळी पं प्रदीप मिश्रा यांनी श्री शिव महापुराण कथेच्या सहाव्या दिवशी संध्याकाळी अकोल्यातील आराध्य दैवत श्री राज राजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
राजेश्वर मंदिरात 20 वर्षापूर्वी देखील पंडित प्रदीप मिश्रा यांनी येवून दर्शन घेतले असल्याचे म्हंटल्या जात आहे. महाराज राजेश्वर मंदीरात येणार असल्याचे माहित होताच हजारों भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा