- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
spirituality-shiv-mahapuran-katha: प्रदीप महाराज मिश्रा यांनी सहाव्या दिवशी भक्ती आणि शक्तीची कथा ऐकविली
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील म्हैसपूर येथे 5 मे पासून 11 मे पर्यंत श्री स्वामी समर्थ शिव महापुराण आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित कथावाचक पं प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून तर दुपारी साडेतीन वाजता पासून संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत बाल कथावाचक पं श्रीकृष्ण महाराज दुबे यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा सुरू आहे.
या कथा वाचनाच्या सहाव्या दिवशी पं प्रदीप महाराज मिश्रा यांनी आज सहाव्या दिवशी भक्ती आणि शक्तीची कथा ऐकविली. यामध्ये शिव मंदिराच्या कळसाची सावली जिथे जिथे पडत होती, तिथे तिथे वाल्मिकी समाजाची महिला बालपणापासून वृद्धपकाळ पर्यन्त झाडू लावत होती. त्यामुळे माता पार्वतीने त्या महिलेला कचऱ्यात हिरा टाकून तिची भक्तीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिरा सापडल्यावरही तिने तिचे झाडू मारण्याचे काम अखंडित चालू ठेवले, असे विस्ताराने कथा ऐकवली.
श्रीमद भागवत कथेमध्ये बाल कथावाचक पं श्रीकृष्ण महाराज दुबे यांचे संस्कृत भाषा वर प्रभुत्व मिळवले असून, संगीतमय कथा सांगतांना सजीव देखावे उभे करण्यात येत आहेत. त्यामुळे कथा ऐकतांना वेगळाच आनंद श्रोता व भाविकांना येत आहे . म्हैसपूर येथील शिव महापुराण कथा आयोजक रुपेश चौरसिया आणि विजय दुबे परिवाराने पूजा करून शिव महा पुराण कथेला शिव शंकराच्या जयकाराने प्रारंभ करण्यात आला होता. यावेळी लाखोंच्या संख्येने महिला भविकांसह भाविक उपस्थित होते. याच भविकांच्या उपस्थिती मध्ये वृन्दावन निवासी बाल कथावचक श्रीकृष्ण महाराज दुबे यांच्या वाणीतून दुपारी साडे तीन ते साडे सहा यावेळेत श्रीमत भागवत कथा सुरू आहे कथेच्या सहाव्या दिवशी आज श्रीकृष्ण सुदामा मित्र प्रेमाची कथा एकविली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा