motivational-speaker-sonu-sharma-in-Akola : मोटिवेशनल स्पीकर सोनू शर्मा रविवारी अकोल्यात; मुंगीलाल बाजोरिया हायस्कूल मैदानात होणार सेमिनार, प्रवेशिका उपलब्ध







भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था, माहेश्वरी टाईल्स अँड सेनिटरी व बंसल क्लासेस अकोला शहरात प्रथमच 2738+ वेबीनार, 1440+ सेमिनार, 800+ कार्यशाळा, 400+ कार्पोरेट प्रशिक्षण शिबिरे घेणारे इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर सोनू शर्मा यांना रविवार 14 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता मुंगीलाल बाजोरिया हायस्कूल प्रांगण, अकोला या ठिकाणी घेऊन येत असल्याची माहिती माहेश्वरी टाईल्स अँड सेनिटरीचे संचालक हरीश माहेश्वरी यांनी दिली.





शुक्रवारी हॉटेल जसनागरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत हरीश माहेश्वरी यांनी कार्यक्रम आयोजनची सविस्तर माहिती देवून आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.


            उद्योजक हरीश माहेश्वरी 



अकोला, बुलडाणा, वाशिम वासियांसाठी आयोजन 


सेमिनार विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, महिला पुरुष व युवक- युवती सर्वानी, ऐकावा आणि पहावा असा आहे. सेमिनारमधून तुमचे दैनंदिन जीवनातील ताणताणाव अडचणी दूर सारून संयमाने तुम्हाला विजय मिळवून देणारा मार्गदर्शन सोहळा ठरेल, असा विश्वास माहेश्वरी टाईल्स अँड सेनिटरीचे संचालक हरीश  माहेश्वरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सर्व अकोला, बुलडाणा, वाशिम वासियांना सोनू शर्मा यांना पाहण्याची व ऐकण्याची सुवर्ण संधी घालवू नका, असे आवाहन केले आहे. 



सेमिनार प्रेरणा देईल


कार्यक्रम हा सामाजिक उद्देशाने ठेवण्यात आलेला आहे व यामधून नवीन होऊ पाहणाऱ्या उद्योजकांना यशस्वी बनण्याची नांदी ठरेल. कारण बरेचसे असे लोक आहेत, कि जे मोठे बनण्याची स्वप्ने पाहतात. परंतु त्यांना सुरवात कोठून करावयाची याची माहिती नसते. बऱ्याच लोकांना भरभराट करणारा व्यावसाय बनवायचा आहे. पण दिशा नाही, बरेच लोक तणावग्रस्त असतात. त्यांना त्यामधून मुक्त होण्यासाठी एक शक्तिशाली मार्ग हवा असतो. पण तो सापडत नाही, अश्या सर्व संकटावर मात मिळवायची असेल तर नक्कीच हा सेमिनार प्रेरणा देईल.  त्यातून मुक्त करेल, असा दृढ विश्वास  हरीश्जी माहेश्वरी यांनी या व्यक्त केला आहे.


महिलांना आवाहन


माहेश्वरी यांनी सांगितले कि, अकोला हे पुरोगामी व धार्मिक विचारांचे माहेरघर आहे. हे प्रत्येक धार्मिक कार्यक्रमातून दिसून येते. शिवपुराण कथा या धार्मिक कार्यक्रमातून दिसून आले आहे. धार्मिक कार्या बरोबर सामाजिक कार्य देखील तितकेच महत्वाचे आहे परमार्थ बरोबर सामाजिक कार्य हि महत्वाचे आहे, म्हणूनच नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था हे असे सामाजिक उपक्रम राबवत असते. सामाजिक उद्देशाच्या भावनेतून 'सफलता कि ओर उड़ान' या कार्यक्रमातून महिलांना सक्षम करण्यासाठी सोनू शर्मा यांचे अतिशय महत्वपूर्ण सेमिनार ठरेल. म्हणूनच नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थेने असे सर्व महिलांना आवाहन केले आहे की, ज्या महिला नवनिर्माण बहुउद्देशीय संस्थेच्या सभासद बनतील, अश्या महिलांना केवेळ सवलतीच्या दारामध्ये केवळ 100 रुपये मध्ये सभासद नोंदणी करून सेमिनार मध्ये प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी,असे माहेश्वरी म्हणाले. 

सभासद नोंदणीसाठी महिलांनी  माहेश्वरी टाईल्स अँड सेनिटरी w-37, 38 नेक्सस शोरूम शेजारी, भारत पेट्रोल पंप समोर, बी. के. चौक, MIDC-3, अकोला- 7840916126 येथे संपर्क साधला.



येथे साधावा संपर्क 

या सेमिनारचे सीट (आसन) खूपच कमी प्रमाणात उपलब्ध असून आपली सीट लवकरच बुक करून घ्यावी, अन्यथा आयुष्यामधील सर्वात महत्वाची सुवर्णसंधी गमवून बसाल. त्यामुळे आपली सीट आरक्षित किंवा बुक करण्यासाठी आजच 7840916126, 7522912364, 7410716392, 9822021040 या नंबर वर संपर्क करा किंवा तहसील कार्यालयाच्या समोर महानगरपालिका कॉम्प्लेक्स पहिला मजला गळा नं. 21 व शुभमंगल कार्यालयाच्या बाजूला गोरक्षण रोड अकोला, बंसल क्लासेस गोयनका नगर, जवाहर नगर अकोला, मिराज सिनेमागृह, सातव चौक, यस. आर. कलेक्शन अकोट फैल, येथे संपर्क साधावा. तसेच 'बूक माय शो' वरती देखील 'सफलता की ओर उड़ान' या नावाने सर्च करून ऑन लाईन तिकीट बुक करू शकता, असे माहेश्वरी यांनी सांगितले.

टिप्पण्या