public holidays : सन 2023 च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर



file photo 



मुंबई, दि. 7: महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन 2023 सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

जानेवारी

यामध्ये  प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी गुरुवार, 

फेब्रुवारी

महाशिवरात्री 18 फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी रविवार, 



मार्च

होळी (दुसरा दिवस) 7 मार्च मंगळवार ,गुढीपाडवा 22 मार्च बुधवार, रामनवमी 30 मार्च गुरुवार, महावीर जयंती 4 एप्रिल मंगळवार, 


एप्रिल

गुड फ्रायडे 7 एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल शुक्रवार, 


मे

महाराष्ट्र दिन 1 मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा 5 मे शुक्रवार, 


जून

बकरी ईद (ईद उल झुआ) 28 जून बुधवार, 


जुलै

मोहरम 29 जुलै शनिवार, 



ऑगस्ट

स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 16 ऑगस्ट बुधवार, 


सप्टेंबर

गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबर गुरुवार, 



ऑक्टोबर

महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर सोमवार, दसरा 24 ऑक्टोबर मंगळवार, 


नोव्हेंबर

दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 12 नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) 14 नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर सोमवार, 



डिसेंबर

ख्रिसमस 25 डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


भाऊबीजला अतिरिक्त सुट्टी

 

राज्य शासनाने आता भाऊबीज, बुधवार दि.15 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.



केवळ बँकांपुरती मर्यादित


बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी 1 एप्रिल 2023 , शनिवार सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे. ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत.




या सार्वजनिक सुट्ट्यांबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.


टिप्पण्या