political news- bjp - ncp - akola: बाळापुर मतदार संघाचे सर्व समीकरणे बदलणार: माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा भाजपात प्रवेश निश्चित; देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट



भारतीय अलंकार 24

अकोला, दि.११: बाळापुर मतदार संघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करणारे भारिप बहुजन महासंघाचे दहा वर्ष प्रतिनिधी करणारे माजी आमदार यांनी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या नेतृत्वात आज ११ ऑगस्ट रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा माजी ऊर्जामंत्री बावनकुळे तथा भाजपाचे राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात भेट घेतली. २० ऑगस्ट रोजी अकोला येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सिरस्कर भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित झाले. सिरस्कार यांच्या भाजप प्रवेशामुळे बाळापुर मतदार संघाचे सर्व समीकरणे बदलणार असून येणाऱ्या काळात भाजपाला बहुजन समाजाचे सामर्थ्यवान नेतृत्व लाभणार आहे.





अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक प्रतिमा असणारे नेतृत्व व सर्व सामान्य जनतेची समरस असणारे व्यक्तिमत्वच्या भाजपा प्रवेशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे  आमदार गोवर्धन शर्मा तसेच अकोट मतदार संघाचे प्रकाश भारसाकळे, मुर्तीजापुरचे  आमदार हरीश पिंपळे तसेच विधान परिषदेचे सदस्य वसंत खंडेलवाल तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते तेजराव थोरात यासह संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. सर्व त्यांच्या संमतीने न्याय देण्याच्या भूमिकेमुळे माजी आमदार बळीराम भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केलेले आहे. 



सिरस्कार यांच्या भाजप प्रवेशामुळे बाळापुर मतदार संघाचे सर्व समीकरणे बदलणार असून येणाऱ्या काळात भाजपाला बहुजन समाजाचे सामर्थ्यवान नेतृत्व लाभणार आहे संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या संख्येने असणाऱ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे संपूर्ण विदर्भात भाजपाची ताकद वाढणार आहे. अकोला जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष व  नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे व बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वात बळीराम सिरस्कर यांनी भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केली असून पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक दृष्टीने कार्य करण्याचे निश्चित केले आहे.  



बळीराम सिरस्कार यांचे भाजप प्रवेश यामुळे अकोला जिल्ह्यात आधीच कमकुवत असणाऱ्या राष्ट्रवादीला त्यांच्या पक्ष बदलामुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसणार आहे. पक्षप्रवेशासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे  जयंत मसने, विजय अग्रवाल, सचिन कोकाटे,  राजेश  बेले, हिरासिंग  राठोड व राजू उगले तथा बाळापुर तालुका भाजपा अध्यक्ष अमोल  साबळे व पातुर तालुका भाजपा अध्यक्ष रमण जैन इत्यादी भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, २० ऑगस्ट रोजी उमरी स्थित सावित्रीबाई ज्योती फुले विद्यालयाच्या प्रांगणात कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांसह प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.

टिप्पण्या