Road accident- akot crime-akola: भरघाव वेगातील कारने युवतीला अक्षरशः उडविले; पाच दुचाकीला दिली धडक, संपूर्ण थरार सीसीटिव्ही बद्ध




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट शहरातील नेहमीच वर्दळीचा असलेल्या नरसिंग मार्गावर आज दुपारी एका चारचाकी वाहनाने भरघाव येवून रस्त्याने पायी जात असलेल्या युवतीला अक्षरशः उडविल्याची घटना घडली. या घटनेत युवती गंभीर जखमी झाली असून,तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती आहे. 




घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, आज दुपारी अकोट शहरातील नरसिंग मार्गावर एका भरधाव कारने पाच दुचाकीला धडक देत रस्त्या वरून चालत जाणाऱ्या एका युवतीला विरुद्ध दिशेने उडवले. या घडकेत ही युवती गंभीर जखमी झाली. युवती सोबत आणखी दोघी होत्या. मात्र, सुदैवाने यातून  त्या थोडक्यात बचावल्या. 




सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक  युवक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आहे. या युवकाला गाडी चालवता येत नसून, त्याकडे ड्रायविंग लायसन्स सुद्धा नसल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. 




अकोट वाहतूक पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर मोटार वाहन कायदा , भा. दं. वि. अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. भरदुपारी घडलेली ही संपूर्ण घटना परिसरातील एका ठिकाणच्या सीसीटिव्हीत कैद झाली आहे. तर अनेकांनी हा थरार प्रत्यक्ष पाहिला. घटनेचा पुढील तपास अकोट पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या