- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: भाजप सरकारला नव्या सैन्य भरतीचे नियम बदलून २४ तासही उलटले नाहीत.म्हणजे घाईघाईने योजना तरुणांवर लादली जात आहे. ही योजना त्वरित मागे घ्या,थांबलेल्या भरतीमध्ये घेऊन लवकर निर्णय द्या पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करा, या मागणीसाठी जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमीर शेख यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या मार्गदर्शनात व अंकुश तायडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
यावेळी भाजपा सरकार विरुद्ध आंदोलकांनी घोषणा बाजी केली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून काही वेळाने सुटका केली.
आंदोलनात विद्यार्थी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष अभिजित तवर, जिल्हा महासचिव ऋषिकेश जामोदे, महासचिव अक्षय गडेकर, युवक कांग्रेस पश्चिम विधानसभा अध्यक्ष मोहम्मद शारिक, विधानसभा अध्यक्ष अमोल ठोकणे,पवन खात्री, सुरज बेंद्रे, इम्रान पठाण लोकेश सावजी अशिष सरनाईक,अमर साबळे, गोलू गवई, गुड्डू सारवान, संतोष झांझोटे आदी सहभागी झाले होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा