Earthquake-shakes-Barshitakali-Akl: अकोल्यात बार्शीटाकळी जवळ भूकंपाचे धक्के…




भारतीय अलंकार 24

अकोला,दि.११: शहरापासून २३ कि.मी. अंतरावर बार्शीटाकळी जवळ आज सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून, सुदैवाने यामध्ये मालमत्तेचे अथवा जीवित हानी झालेली नाही. 




जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, हवामान विभाग अकोलाचे वैज्ञानिक सहायक मिलिंद धकिते व कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजीकल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या आधारे ही माहिती दिली आहे. 



या माहिती नुसार आज सायंकाळी पाच वाजून ४१ मि.१८ सेकंदांनी या धक्क्याची नोंद झाली. २०.५३०N व ७७.०८०E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिक्टर स्केल वर ३.५० इतकी तीव्रता नोंदविण्यात आली. या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही,असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या