- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
vba-akola-balasaheb-ambedkar-bd: वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा आयोजित भव्य स्वाभिमान सप्ताह अंतर्गत आज कृतज्ञता सोहळा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
अकोला: बहुजन नायक बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा आयोजित भव्य स्वाभिमान सप्ताह अंतर्गत आज ११ मे बुधवार रोजी प्रा.अंजलीताई आंबेडकरांच्या उपस्थित कृतज्ञता सोहळा तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा संध्याकाळी ५ वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे होणार आहे.
या भव्य कार्यक्रमात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान होणार आहे. बहुजन नायक बाळासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर व्याख्यान संध्या. ७ वाजता होणार आहे. व्याख्याते राजेंद्र पातोडे (प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी) राहणार आहेत.
याप्रसंगी प्रा अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उपस्थितांच्या साक्षीने केक कापून बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. संध्या. ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
विविध स्पर्धांचे विजेते, प्रशंसक, वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती राहावे,असे आवाहन. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महीला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले आंबेडकर विद्वत सभा आदींनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा